
काठमांडू, दि. २२ – एव्हरेस्ट शिखर सर करून दक्षिणेकडून खाली उतरत असताना चौघा गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जर्मन डॉक्टर एबहार्ड शाफ, नेपाळमध्ये जन्मलेली कॅनडीयन महिला श्रेया शाह, दक्षिण कोरियाचा सोंग वोनडिन आणि चीनचा वेन हा अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांचा मृत्यू झाल्याने यंदाच्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमेत मरण पावलेल्यांची संख्या सहा झाली आहे, अशी माहिती नेपाळच्या एका अधिकार्याने दिली. या महिन्यातच दोन नेपाळी शेर्पांचा एव्हरेस्ट मोहिमेत मृत्यू झाला होता.
