भारताच्या तिरंदाजी संघाला उन्हाळ्याचा फटका

गंगटोक, दि. २१ – कोलकातामधील प्रचंड उकाडा लक्षात घेऊन भारतीय तिरंदाजी संघटनेने तिरंदाजीचे भारतीय ऑलिम्पिक संघाचे शिबीर तात्पुरते सिक्किमच्या चालजोर स्टेडियम येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाताच्या अतिशय गरम आणि दमट हवामानामुळे तिरंदाजांना प्रशिक्षणात अडथळे येऊ लागले आहेत. त्यामुळे तिरंदाजीचे ऑलिम्पिक शिबीर तात्पुरते आम्ही गंगटोक येथे स्थलांतरीत केले आहे, असे भारतीय तिरंदाजी संघटनेचे सचिव परेशनाथ मुखर्जी म्हणाले. स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीकोनातून हे शिबीर तिरंदाजीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. सिक्कीम तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष टी. टी. भूतीया महणाले, अशा प्रकारांच्या शिबिरांमुळे स्थानिक स्तरावरील खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळते. मुख्य प्रशिक्षक अहारी म्हणाले, गंगटोक मधील हवामान हे तिरंदाजासाठी अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे त्यांना अनेक सत्रात प्रशिक्षण करण्यास मदत होईल. तसेच येथील हवामान लंडनमधल्या हवामानाशी अनुरूप असल्याने त्यांना अधिक अभ्यास करता येईल. हे प्रशिक्षण शिबीर जूनपर्यंत चालणार आहे. महिला आणि पुरूष तिरंदाजी संघाच्या या शिबीरात तीन आठवडे आपले प्रशिक्षण हे संघ घेणार आहेत. महिला संघातील दीपिका कुमारी एल. बोम्बाला, चेकरोवोलु स्वुरो या लंडन ऑलिम्पिकसाठी संघातील सिक्किमच्या तरूणदीप राय, जयंत तालुकदार आणि राहुल बॅनर्जी यापैकी जयंत तालुकदारच फक्त लंडन ऑलिम्पिकसाठी वैयक्तिक प्रकारात पात्र ठरले आहेत.

अमेरिकेतल्या ऑगडेन येथे १७ ते २४ जून दरम्यान होणार्‍या तिरंदाजी विश्‍वचषक स्पर्धेत तरूणदीप आणि राहुल यांना ऑलिम्पिंकसाठी पात्र ठरण्याची ही शेवटची संधी आहे.

Leave a Comment