अॅपलचा टीम कुक बेस्ट पेड सीईओ

न्यूयॉर्क दि,२२- येथील वॉल स्ट्रीट जर्नलने केलेल्या सर्वेक्षणात २०११ सालासाठी सर्वात अधिक मानधन मिळविणारा सीईओ म्हणून अॅपलच्या टीम कुकचा नंबर लागला असून त्याने या वर्षात वार्षिक पगारापोटी ९लाख डॉलर्स तसेच इन्सेंन्टीव्ह पोटीही ९ लाख डॉलर्स कमावले आहेतच पण अॅपलच्या त्यावेळच्या रिस्ट्रीक्टेड स्टॉक ग्रँटपोटीही ३७६ दशलक्ष डॉलर्स खिशात घातले आहेत. आयफोन आयपॅड मेकर अॅपलची धुरा कुकने  ऑगस्टमध्ये म्हणजे कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या मृत्यूआधी दोन महिने सांभाळली होती.

सिलीकॉन व्हॅलीतील अन्य सीईओमध्ये दुसर्‍या क्रमांकाची कमाई करणारा सीईओ म्हणून ओरॅकलच्या लॅरी एलिसची वर्णी लागली असून त्याची कमाई आहे वर्षाला ७६ दशलक्ष डॉलर्स. याचाच अर्थ अॅपलने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या मार्जिनने मात केली आहे. या सर्वेक्षणात तीनशे बड्या कंपन्यांची नोंद घेण्यात आली होती.
 
टेलिव्हीजन ब्रॉडकास्ट सीबीएसचा प्रमुख लेस्ली मुनव्हेस याचा या यादीत तिसरा क्रमांक असून त्याची कमाई आहे ६९ दशलक्ष डॉलर्स.

Leave a Comment