रणदीप व कुणाल दिसणार एकत्र

    नव्या दमाचे कलाकार रणदीप हुड्डा व कुणाल खेमू हे दोघेजण एकाच चित्रपटात काम करणार आहेत. विशाल महाडकर दिग्दर्शित क्राईम, थ्रीलरवर आधारित नवा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटासाठी दोघांकडे विचारणा करण्यात आली आहे. केवळ त्यांचा होकार मिळण्याची प्रतीक्षा आहे.
    विशालचा जगभरातील क्राईम व थ्रीलरवर आधारित चित्रपट निर्मिती करण्याची बर्‍याच दिवसांपासून इच्छा होती. त्यासाठी आता त्याला चांगले कथानक मिळाले आहे. त्यामुळे त्याने कलाकार निवडीचे काम सुरू केले आहे.
    या चित्रपटात अंडरवर्ल्डशी संबंधित कथानक असल्याने दोन नायक व एक नायिका असा प्रेमाचा त्रिकोण असणार आहे. या चित्रपटासाठी विशालला नव्या दमाचे कलाकार हवे असल्याने त्यांनी रणदीप हुड्डा व कुणाल खेमू यांच्याकडे विचारणा केली आहे. दोघांनीही चित्रपटात काम करण्यासाठी प्रथमदर्शनी होकार दर्शविला आहे. त्या दोघांनाही स्क्रीप्ट वाचण्यासाठी दिली आहे.
    यापूर्वी रणदीपने ‘जन्नत २’मध्ये चांगला अभिनय केला आहे. त्यामुळे सध्या त्याला वाढती मागणी आहे. त्यासोबतच कुणाल खेमूने ‘ब्लडमनी’ या चित्रपटात काम केले आहे. त्याशिवाय नायिका म्हणून ‘जन्नत २’ या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणार्‍या एशा मुक्ताला संधी देण्यात येणार आहे. नवीन नायिकेला घेवून विशालचा जगभरातील गुन्हेगारी विश्‍वावर प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न असून, आगामी काळात त्याच्या चित्रपटाला प्रेक्षक कितपत प्रतिसाद देतात, यावर बरेचसे काही अवलंबून आहे.
 

Leave a Comment