आयओबीच्या एकूण व्यवसायात २४.२० टक्के वाढ

मुंबई, दि. १४ –  सार्वजनिक उद्योगातील इंडियन ओव्हरसीज बँकेने (आयओबी) ३१ मार्च २०१२ अखेर संपलेल्या वर्षी  एकूण तीन लाख २१ हजार ७०७ कोटी रूपयांचा एकूण व्यवसाय करून यात गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २४.२० टक्के वाढ नोंदवली. एक लाख ७८४३४ कोटी रूपयांच्या ठेवी जमा केल्या असून ही  वाढ २२.८६ टक्के इतकी आहे. एक लाख ४३ हजार २७३ कोटी रूपयांची कर्जे दिली आहेत तर ३५३४ कोटी रूपयांचा ऑपरेटिंग नफा कमविला आहे. बँकेने १०५० कोटी १३ लाख रूपयांचा निव्वळ नफा कमविला आहे.

Leave a Comment