माजी खेळाडूंसाठी क्रिकेट नियामक मंडळ ७० कोटी रुपये खर्च करणार

चेन्नई, दि. १२ – जवळपास १६० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे खेळाडू २००३-०४ पूर्वी निवृत्त झाले आहेत, अशा खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या योजनेतून फायदा मिळणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मिळालेल्या नफ्याच्या पैशाचा वापर येथे होणार आहे. सुमारे ७ कोटी रुपये या योजनेसाठी खर्च केले जाणार आहेत, असे चेन्नई येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर दिलेल्या प्रसिद्धी प्रत्रकात म्हटले आहे. जे खेळाडू १०० कसोटी आणि त्यापेक्षा जास्त कसोटी खेळले आहेत त्यांना ३.५ कोटी रुपये, तर जे खेळाडू ७५ ते ९९ या दरम्यान कसोटी सामने खेळले आहेत त्यांना एक कोटी रुपये दिले जाणार आहेत. ज्या खेळाडूंना ५० आणि ७४ या दरम्यान कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूंना ७५ लाख रुपये, २५ ते ४९ कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूंना ६० लाख तर १० ते २४ कसोटी सामने खेळले असतील त्या खेळाडूंना ५० लाख रुपये दिले जाणार आहेत.
    जे खेळाडू १ ते ९ कसोटी सामने आणि १९७० पूर्वी आपला शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामना खेळले आहेत त्यांना ३५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. ज्या खेळाडूंनी १०० आणि त्यापेक्षा आधिक सामने खेळणार्‍या खेळाडूस ३० लाख रुपये देण्यात येणार आहेत.

Leave a Comment