अमिताभ- मधूर भांडरकर आले एकत्र

    ऐश्वर्या रॉयने ‘हिरोईन’ चित्रपट सोडण्याच्या कारणावरून ‘बीग बी’ अमिताभ बच्चन व दिग्दर्शक मधुर भांडरकर यांच्यातील संबंध गेले काही दिवस ताणले गेले होते.
ऐश्वर्या प्रेगनंट असल्याच्या कारणावरून भांडरकर दिग्दर्शित ‘हिरोईन’ या चित्रपटात काम करण्यास नकार दर्शविला होता. त्यावेळी भांडरकरनी ऐश्वर्याच्या कृतीबद्दल प्रसारमाध्यमापुढे नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांनी सुनेची बाजू घेतली होती. जरी कलाकार असले तरी लग्न व मुलांना जन्म घालण्याचा अधिकार इतर कामापेक्षा महत्त्वाचा आहे, असे म्हणत भांडरकरवर टीकास्त्र सोडले होते.
    त्यामुळे काही काळापासून भांडरकर- अमिताभ बच्चन तेढ निर्माण झाली होती. यापूर्वी दोघांचे चांगले असलेले संबंध या प्रकारामुळे बिनसले होते. कार्यक्रमादरम्यान दोघेही समोरासमोर आले तर बोलायचे टाळत होते. त्यामुळे दोघांतील दरी चांगलीच वाढली होती.
    दोनच दिवसांपूर्वी एका जाहिरातीचे चित्रिकरण अमिताभ बच्चन करीत होते. त्यावेळी योगायोगाने त्याठिकाणी मधुर भांडरकर त्याठिकाणी आले. त्यांच्यातील मतभेद दूर ठेवून मधूरने अमिताभजींच्या हातात हात दिला. त्यानंतर दोघात झालेल्या संवादानंतर कित्येक दिवसांपासून असलेल्या वादावर पडदा टाकला. दोघांच्या चर्चेनंतर त्यांचे चेहरे पाहता, हे प्रकरण दोघांनी मिळूनच मिटविल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावरून स्पष्टपणे जाणवत होता.

Leave a Comment