हिरॉईनसाठी घेतलेल्या मेहनतीचा करिनाच्या तब्येतीवर परिणाम

मुंबई- मधुर भांडारकरच्या ड्रीम प्रोजेक्ट हिरॉईन या सिनेमाची नायिका करिना कपूर या सिनेमासाठी इतके कडक परिश्रम करत आहे की त्यामुळे त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करिनाने नुकत्याच केलेल्या शूटिंगमध्ये इमोशनल सिन्स करताना ती इतकी मनापासून करत होती की अखेर तिला घसादुखीचा त्रास सुरू झाला आणि बोलणेही अशक्य झाले.
  अर्जुन रामपाल आणि रणदीप हुडा हे या चित्रपटात तिच्या सोबत काम करत आहेत. सिनेमातील कांही दृष्ये इतकी भावनिक आहेत की त्यात करिनाच्या अभिनयाचा खरा कस लागला आहेच पण ही दृष्ये देताना करिना आधीपासूनच संबंधित सीनची इतकी कसून तयारी करत होती की सेटवर दृष्य सुरू होताच अॅक्शन म्हटले की दुःखी प्रसंगात करिना ताबडतोब ओक्साबोक्सी रडू लागे. अश्रू येण्यासाठी ग्लिसरीनचा वापरही तिला करावा लागला नाही. हुंदके देता देता संवादही ती तितक्याच तयारीने म्हणत असे.बरेचवेळा मधुरला शॉट ओ के म्हणण्याचेही भान राहात नसे म्हणे. करिनाचा हा नैसर्गिक अभिनय सर्वांना थक्क करून गेला असला तरी शूटिंगच्या अखेरी ती अगदी गलितगात्र झालेली असे. त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला असे सांगितले जात आहे.
   हा किस्सा ऐकल्यामुळे आता हिरॉईन कधी एकदा पडद्यावर येतोय याची उत्सुकता लागली ना?