अक्षय कुमारचा भाव वधारला

महागाईमुळे सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. या महागाईची झळ बहुतेक अक्षय कुमार बसली आहे. त्यातून आता तो दुसर्‍यांदा बापही बनणार आहे म्हणजे खर्चात वाढच की. म्हणूनच कदाचित अक्षयने आपला दरही वाढविला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्व खानांना मागे टाकून तो याबाबत एकदम आघाडीवर गेला आहे. त्यातूनच त्याचा हाऊसफुल्ल टू प्रचंड यशस्वी झाला आहे.
    अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षयने लिडिंग ब्रँडच्या मोटारसायकल जाहिरातीसाठी पाच वर्षाला पन्नास कोटी रूपये मागितले आहेत. आमीरखान वर्षाला ९ कोटी तर सलमान आणि शाहरूख वर्षाला सात कोटी या दराने जाहिराती करतात. अक्षयने याबाबत त्यांना मागे टाकले आहे.
    गेली आठ वर्षे ज्या सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात अक्षय करतो आहे, त्या कंपनीने कांही काळापूर्वी त्याला पैसे वाढवून देणार नसल्याचे व करार वाढविणार नसल्याचे कळविले होते. पण आता ही कंपनीही अक्षयची वाढती लोकप्रियता पाहून पुन्हा त्याच्याकडेच करार करण्यासाठी आग्रही असल्याचेही समजते.

Leave a Comment