पुणे व मुंबई मध्ये आतंकी हल्याची शक्यता

पुणे: पुण्यासह मुंबई, सुरत, अहमदाबाद आणि दिल्ली या शहरात दहशतवादी कारवाया करण्याच्या लष्कर ए तोयबाच्या कटाचा सुगावा केंद्रीय गुप्तवार्ता विभागाला (आयबी) लागला असून या विभागाने पाच संशयित दहशतवाद्यांची छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


जर्मन बेकरी बॉम्बस्फोतपर्यंत पुणे शहरात दहशतवादी कारवाया झाल्या नसल्या तरीही पूर्वीपासून शहरात दहशतवादी शक्ती आणि त्यांचे सहानुभूतीदार बस्तान बसवून आहेत. देशभरातील अनेक कारवायांचे नियोजन आणि आखणी पुण्यातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आता तर पुण्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे आयबीने केलेल्या तपासात उघड झाले आहे. त्यानुसार शहर पोलिसांबरोबरच दहशतवाद विरोधी पथकाने काटेकोर बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन डी ए) आणि इतर लाशारी आस्थापना, धार्मिक आणि संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
    

पुणे, मुंबईसह महानगरांच्या लगतच्या मध्यम शहरातही सतर्क राहण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे.

Leave a Comment