
यांगून, दि.९ – म्यानमारच्या विरोधी नेत्या आँग सांग सू की अखेर वीस वर्षानंतर नोबेल पुरस्कार स्वीकारणार आहेत. सू की यांना २४ वर्षांनंतर प्रथमच म्यानमारमधील राजवटीने पासपोर्ट बहाल केला आहे. म्यानमारमधील लष्करी राजवटीने अगदी अलीकडेपर्यंत त्यांना नजरकैदेत ठेवले होते.
आँग सांग सू की यांना पासपोर्ट देण्यात आल्याने पुढील महिन्यात नॉर्वे येथे जाण्याची त्यांची योजना आहे. १९९१ मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार त्यांना घोषित झाला होता. सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या नॉर्वेला जाणार आहेत. तसेच आपल्या या दौर्यात त्या ब्रिटनलाही भेट देणार आहेत. आँग सांग सू की यांनी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयास भेट देण्याच्या निमंत्रणाचाही स्वीकार केला आहे.
