‘मारूती ’ ने किमती वाढविल्या

वाढत्या खर्चाने हैराण झालेल्या मारूती सुझूकीने सेदान प्रकारातील लोकप्रिय ठरलेल्या डिझायर (डिझेल) च्या मोटारींची किंमत आठ ते १२ हजार रूपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून डिझायरच्या किमती वाढविण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, हा भार कमी करण्यासाठी मोटारींच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही दरवाढ १ मे पासून लागू झाली आहे.

कंपनीने गेल्या फेब्रुवारीत डिझायरची छोटी श्रेणी बाजारात आणली. ही मोटर डिझेल व पेट्रोल  या दोनही प्रकारांत उपलब्ध आहे. या आधीही अर्थसंकल्पात उत्पादन शुल्क वाढविल्यामुळे कंपनीने मोटारींच्या किमतीमध्ये ५७ हजार रूपयांपर्यंत वाढ केली होती. त्यातच गेल्या काही महिन्यांमध्ये डॉलरच्या तुलनेत रूपयाचे अवमूल्यन सुरू असल्यामुळे कच्च्या मालाच्या आयातीसाठी कंपनीला जादा खर्च करावा लागत आहे. यामुळे मोटारीच्या किमती वाढविण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment