
हैदराबाद, दि. ९ – दिल्ली डेअरडेव्हिल्स गुरूवारी हैदराबाद येथे होणार्या डेक्कन चार्जर्सबरोबरच्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविण्याचा प्रयत्न करतील. गेल्या सामन्यात दिल्लीला ६ गडी राखून पराभव पत्कारावा लागल्याने कोतकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाले आहे. दिल्लीने आत्तापर्यंतच्या झालेल्या ११ सामन्यांमध्ये १६ गुण कमाविले आहेत. तर डेक्कन चार्जर्सच्या संघ गुण मालिकेत सर्वात तळाशी असून १२ सामन्यांमध्ये त्यांनी ५ गुणांची कमाई केली आहे. गुरूवारचा सामना जिंकत स्पर्धेतले आपले स्थान पक्के करण्याचा ते प्रयत्न करतील. कारण येणार्या सामन्यांमध्ये रॉयल चँलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याशी दिल्लीचे सामने होणार आहेत. पण कोलकाता सोबत झालेल्या सामन्यात त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजी अतिशय सुमार झाली होती. पहिल्यांदाच त्यांच्यामधल्या फलंदाजी फळीचा कस लागला होता आणि ती ढेपाळली होती. संघात समावेश झालेल्या न्यूझीलंडच्या रॉय टेलरला अजूनही सूड गवसलेला नाही. केविस पीटरसन मायदेशी परतल्यानंतर त्याची संघात वर्णी लागली होती. पीटरसन जरी गेला असला तरी ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची संघात वर्णी लागल्यानंतर त्यांची फलंदाजी सुधारली आहे. दिल्लीचा संघ तसा डेक्कनच्या तुलनेत संतुलित आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून व्हाईट आणि दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन चांगली कामगिरी बजावत आहे. डेक्कनचा संघ सुरूवात चांगली करतो सामन्याच्या शेवटी विजय मिळवण्यात मात्र ते अपयशी ठरतात. याआधीच ते या हंगामातून बाहेर फेकले गेले आहे, त्यामुळे त्यांना गमविण्यासारखं काहीच नाही.
