निर्यात वाढीचे लक्ष्य गाठणे अवघड- एफआयईओ

युरोपमधील कर्जसंकट व अमेरिकेचा मंदावलेला विकास यामुळे चालू आर्थिक वर्षात २१ टक्के हा देशातील निर्यातवाढीचा वेग कायम राखणे व निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण असल्याचा अंदाज भारतीय निर्यात महासंघ (एफआयईओ) ने व्यक्त केला आहे.

२०१४-१५ या आर्थिक वर्षापर्यंत ५०० अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य सरकारने निर्धारित केले आहे. मात्र, जागतिक स्तरावरील आव्हानांचा विचार करता हे कठीण आहे. तसेच, यंदा देशाची निर्यात ३५० अब्ज डॉलरवर जाणार नसल्याचे एफआयईओचे म्हणणे आहे.

२०११-१२ या वर्षामध्ये देशाच्या निर्यातीत २१ टक्क्यांची वाढ होवून, ३०३ अब्ज डॉलरचा टप्पा गाठला होता. मात्र यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये पाच-सहा टक्क्यांची वाढ होणार नाही. या कठीण काळातून मार्ग काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय  स्तरावर परवडणार्‍या पतपुरवठयाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांकडून होणार्‍या निर्यातींना रूपयातील चढ-उताराचा मोठा फटका बसत आहे. या क्षेत्रातून ४० टक्के निर्यात होत असून, या स्थितीत त्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे एफआयईओचे म्हणणे आहे.

Leave a Comment