ट्वेंटी-२० विश्‍वचषक २०१२ मध्ये मॅच फिक्सिंगचे वारे

नवी दिल्ली, दि. ८ – यावर्षी श्रीलंकेत होणार्‍या ट्वेंटी-२० विश्‍वचषक स्पर्धेमध्ये मॅच फिक्सींगचे वारे वाहताना दिसत आहेत.    आयसीसी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणि दिल्ली पोलीसांच्या सहाय्याने एका महिला एजंटला अटक केली आहे.त्या महिलेकडून फोन आणि डायरी जप्त केली आहे. त्यामध्ये सट्टेबाजांचे नंबर व त्याबद्दल माहिती मिळाली आहे. या खळबळजनक माहितीनुसार १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान श्रीलंकेत होणार्‍या ट्वेंटी-२० विश्‍वचषक सामन्यात फिक्सिंग होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे, असे पकडण्यात आलेल्या महिलेने कबुल केले आहे. या विभागाने महिलेबद्दल अधिक माहिती सांगण्यास नकार दिला आहे. या अटक प्रक्रियेनंतर क्रिकेट विश्‍वाला फिक्सिंगची कीड परत एकदा लागते की काय अशी भीती क्रिकेटप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.

Leave a Comment