नंबर पोर्टेबिलीटीमुळे ‘आयडिया’ चे ग्राहक वाढले

दूरसंफ क्षेत्रातील कंपनी आयडिया सेल्युलरने मार्च महिन्यापर्यंत मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून सर्वाधिक ३३ लाख २० हजार ग्राहक जोडले आहेत. त्यानंतर व्होडाफोन आणि एअर टेलने अनुक्रमे २८ लाख २० हजार व १२ लाख १० हजार ग्राहक जोडले आहेत.

आयडियाकडे नंबर पोर्टेबलिटीच्या माध्यमातून सेवा घेण्यासाठी ९२ लाख ९० हजार अर्ज आले त्याचवेळी या सेवेतून बाहेर पडण्यासाठी ५९ लाख ७० हजार अर्ज प्राप्त झाले. त्याचवेळी व्होडाफोनच्या सेवेला एक कोटी १० लाख चार हजार ग्राहकांनी पसंती दिली. तर बाहेर पडण्यासाठी ८१ लाख ५० हजार ग्राहकांनी अर्ज केले.

जानेवारी २०११ पासून सरकारने मोबाइल पोर्टेबिलिटीची सेवा उपलब्ध करून दिली. या सेवेमुळे ग्राहकांना मोबाइल क्रमांक न बदलता दुसरी सेवा घेता येते. दरम्यान, नंबर पोर्टेबिलिटीची सेवा नाकारल्याच्या २६३२५ तक्रारीही आल्या आहेत.

नंबर पोर्टेबिलिटीच्या नियमांनुसार या तक्रारींचे १५ दिवसांच्या आत निराकरण करणे आवश्यक असून, जम्मू-काश्मीर आसाम व ईशान्य भागांकाठी हा नियम लागू नाही.

Leave a Comment