बेस्ट भाडेवाढ; विद्यार्थी व अंधाना दिलासा

मुंबई, दि. ८ – बेस्ट उपक्रम तोट्यातून फायद्यात येण्यासाठी बेस्टच्या बस तिकीट व मासिक पासच्या दरात नुकतीच वाढ केली. ही दरवाढ अंध व शालेय विद्यार्थ्यांच्या बस भाडयावरही लादण्यात आली. मात्र, विरोधी पक्ष व काही संघटना, लोकप्रतिनिधींनी केलेल्या विरोधाची दखल घेत बेस्टने अंधाचे बसभाडे १ रुपयावरुन ३ रुपये केले होते, ते २ रुपये केले तर शालेय विद्याथ्यांचे मासिक पासचे दर जे ९० रुपयांवरुन १५९ रुपये केले आता १२५ रुपये केले आहे.
    या संदर्भातील प्रस्तावास बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच बेस्टच्या भाडेवाढ दरवाढीवर, महापोर सुनील प्रभू यांनीही अंध शालेय विद्यार्थ्यांवर लादलेल्या भाडे दरवाढीस कमी करण्याची सूचना बेस्टला केली होती.
    बेस्टतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी जी विशेष बसची व्यवस्था केली जाते. या बसचे भाडे ९० किमी साठी १५०० रुपये करण्यात आले होते ते आता १ हजार रुपये करण्यात येणार आहे.  

Leave a Comment