रुपेरी पडद्यावर डोंबारी

पोट भरण्यासाठी जीव हातावर घेऊन रस्त्यांवर खेळ करणार्‍या डोंबार्‍यांच्या आयुष्यावर चित्रपट करण्याचे धाडस दाखवले आहे दिग्दर्शक सुनील वाईकर यांनी. आपले आयुष्य तारेवरची कसरत करण्यात घालवल्यानंतर आपल्या मुलीच्या नशिबात हे येऊ नये, यासाठी धडपडणार्‍या आईची ही कथा आहे. सर्कसमध्ये आणि चकाचक वाहिन्यांवरच्या चकाचक कार्यक्रमात कसरती करून थक्क करणारी, मुलींना कौतुकाच्या टाळ्या आणि ग्लॅमर मिळते. मात्र, रस्त्यावरून पोटासाठी थरारक कसरती करीत फिरणार्‍या डोंबारी मुलींना मात्र चार-पाच सुटी नाणीही मिळणे कठीण असते, हे वास्तव मोठया पडद्यावर आणण्याचे धाडस दाखवले आहे दिग्दर्शक सुनील वाईकर यांनी. मुख्य भूमिकेत मेधा घाडगे असून तिच्यासोबत मिलिंद शिंदे, हेमांगी कवी, मधू कांबिकर, शशी गंधे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटासाठी लेखक-पटकथा आणि दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिकांची जबाबदारी सुनील वाईकर यांनी पेलली आहे.

Leave a Comment