बेस्ट ड्रेस्ड स्टार म्हणून ऐश्वर्या तर जबरदस्त ड्रेसिंग सेन्स स्टार म्हणून अमिताभला पसंती

 याहूने एप्रिलमध्ये केलेल्या रेड कार्पेट सेलिब्रिटी सर्वेक्षणात सर्वात बेस्ट ड्रेस्ड स्टार म्हणून ऐश्वर्या राय बच्चनला पसंती मिळाली आहे. तर सत्तर वर्षीय अमिताभही या स्पर्धेत मागे नसून त्याने बेस्ट पॉवर ड्रेसर म्हणून पहिले स्थान मिळविले आहे. अमिताभचा ड्रेसिंग सेन्स अतिशय जबरदस्त आहेच कारण पारंपारिक शेरवानी आणि अत्याधुनिक सूट दोन्हीही त्याला तितकेच खुलून दिसतात आणि हे दोन वेगळ्या पद्धतीचे ड्रेस तो सहजतेने निभावूनही नेतो. दोन्ही प्रकारच्या कपड्यांत तो तितकाच एलिगन्ट दिसतो.
  अल्टिमेट स्टाईल आयकॉन कॅटेगरीत आपला क्रिकेट कप्तान माही धोनीने चक्क दुसरा क्रमांक पटकावला असून डॉन शाहरूख तिसर्‍या स्थानावर आहे. टेकनॉलॉजी आणि स्टाईलचे उत्तम मिश्रण असलेला सेलेब्रिटी म्हणून परफेक्शनिस्ट आमीरला पसंती मिळाली आहे तर मोस्ट स्टायलिश सेलेब्रिटी मॉम म्हणून आपली मलाईका अरोरा खानने बाजी मारली आहे. पारंपारिक वेशभूषेत सिल्क साड्या आणि झुमक्यांवर भर देणार्‍या रेखाची वर्णी लागली असताना आपली विद्या बालन मागे कशी राहणार? स्टायलिश आणि पारंपारिक प्रकारातील मोस्ट युनिक फॅशन सेन्स असलेली अभिनेत्री म्हणून विद्याने हक्क सांगितला आहे.
  याहूच्या या सर्वेक्षणात १२२२३ जणांनी मते नोंदविली होती त्यात १८ ते ३४ वयोगटाचा वाटा तीन चतुर्थांश इतका असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment