डर्टी पिक्चर चा बंगाली रिमेक

द डर्टी पिक्चरहिट झाल्यानंतर या चित्रपटाचे रिमेक अनेक भाषांमध्ये बनवले जाणार आहेत. बंगालीमध्येही चित्रपटाच्या रिमेकची तयारी सुरू आहे. निर्माता शताब्दी रॉय या चित्रपटाचा बंगाली रिमेक बनवणार असून, या चित्रपटात विद्या बालनने साकारलेली सिल्क स्मिताची भूमिका राखी सावंत करणार आहे. या चित्रपटाची ऑफर येताच राखीने काहीही विचार न करता होकार दिला. या चित्रपटात आपण विद्या बालनपेक्षा हॉट दिसणार असल्याचे राखीने म्हटले आहे. राखीने आता विद्याप्रमाणेच हॉट दिसण्यासाठी तयारीही सुरू केली आहे. विद्याने या चित्रपटामुळे बरीच प्रशंसा मिळवली आहे. या चित्रपटामुळे तिच्या करिअरला वेगळेच वळण लागले आहे. हीच इच्छा कदाचित राखीची असावी, त्यामुळेच तर ऑफर आल्यानंतर तिने लगेचच ती स्वीकारली.

Leave a Comment