ट्विंकल खन्ना दुसर्‍या अपत्याच्या प्रतीक्षेत

अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना आपल्या दुसर्‍या अपत्याची प्रतीक्षा करत असून सप्टेंबरमध्ये ट्विंकल प्रसूत होणार असल्याचे खुद्द अक्षयकुमार यानेच सांगितले आहे. त्यांना आरव नावाचा पहिला मुलगा असून तो अकरा वर्षांचा आहे.
  मुंबईतील सुझन रोशनच्या नव्या शोरूमच्या उद्घाटन कार्यक्रमाला ट्विंकल आली होती तेव्हाच ती प्रेग्नंट असल्याची कुजबुज सुरू झाली होती. मात्र त्यानंतर कांहीच बातमी न मिळाल्याने ही चर्चा येथेच थांबली होती. ट्विंकल डॉक्टरांनी पूर्ण बेडरेस्ट सांगितली होती व त्यामुळे ती कोणत्याच कार्यक्रमांना उपस्थित राहात नव्हती. आता तिची तब्येत चांगली असून ती बाहेर पडू लागली आहे असे अक्षयकुमारने सांगितले. ट्विंकलची  आई डिंपल ही लेकीकडेच सध्या राहायला गेली आहे असेही समजते.

Leave a Comment