
मुंबई, दि. २ – गृहपयोगी वस्तू तयार करणारी आघाडीची कंपनी `हिंदुस्थान युनिलिव्हर’ ला ३१ मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीमध्ये ६८६ कोटी ६१ लाख रूपयांचा नफा झाला. २०१०-११ या वर्षामध्ये कंपनीला ५६९ कोटी १८ लाख रूपयांचा नफा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा २०.६३ टक्क्यांनी वाढला आहे.
जानेवारी-मार्च या तिमाहीमध्ये कंपनीच्या विक्रीत चांगली वाढ झाली. तसेच कंपनीचा वर्षभरातील एकूण नफा २८०० कोटी रूपयांवर गेला असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. सन २०१०-११ मध्ये कंपनीने २३०६ कोटी ६६ लाख रूपयांचा नफा मिळविला होता. ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने २२ हजार ९८७ कोटी ७३ लाख रूपयांची विक्री केली, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.
