जीमेल युजर्सना आता स्वतःच्याच भाषेत वाचता येणार मेल

नवी दिल्ली दि.३- कोणत्याही परकीय भाषेत मेल आली तरी जीमेल युजर्स ती आता स्वतःच्या भाषेत वाचू शकतील अशी सुविधा गुगलने उपलब्ध करून दिली असून ती लवकरच कार्यान्वित करण्यात येत आहे. ‘ट्रान्सलेट मेसेज‘ अशा हेडरखाली ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
    कोणत्याही भाषेत आलेली मेल जीमेल युजर या ट्रान्सलेट मेसेजवर क्लीक करून ती मेल स्वतःच्या भाषेत वाचू शकतील असे गुगलचे प्रॉडक्ट मॅनेजर जेक चिन यांनी सांगितले आहे. या विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, गुगलच्या लॅबमध्ये ही प्रणाली यापूर्वीच वापरली गेली असून लॅबतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात या प्रणालीची गरज मोठ्या प्रमाणावर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही सुविधा जगभरातील ग्राहकांसाठीही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता अल्प कालावधीत ही सुविधा जीमेल धारकांना उपलब्ध करून दिली जात आहे. गुगलने प्रत्येक ग्राहकाची मोफत स्टोरेज स्पेस ७.५ जीबी वरून १० जीबीवर नेण्यात येत असल्याची घोषणाही नुकतीच केली आहे.

Leave a Comment