
नवी दिल्ली, दि. २७ – ज्येष्ठ कॉंग्रेस नेते एन.डी. तिवारी यांना डीएनए चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चाचणी करण्यास तिवारी तयार नाही झाले तर पोलिसांची मदत घ्यावी, असे दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले
मुख्य न्यायाधीश ए. के. सिकरी आणि न्या. राजीव सहाय एंउला यांनी शुक्रवारी रोहित शेखरच्या याचिकेवर सुनावणी करताना तिवारींची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. रोहित शेखरने एनडी तिवारी आपले जन्मदाते आहेत आणि त्यांना आपले वडिल म्हणून जाहीर करावे अशी मागणी करत रोहित शेखरने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नारायण दत्त तिवारी यांना डिएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने द्यावेत असे सांगितले.
