शाहरूख कतरिनाची मैत्री चर्चेत

आपली चिकनी चमेली कतरिना कैफ आणि डॉन शाहरूख खान यश चोप्रा यांच्या नांव न ठरलेल्या एका चित्रपटात एकत्र काम करत असून त्यांच्या मैत्रीची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सुरू आहे. शाहरूख आणि कतरिना यांना एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो आहे. कतरिनाच्या म्हणण्याप्रमाणे तिला शाहरूखच्या रूपाने चांगला मित्र मिळाला असून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील तसेच व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती शाहरूखशी शेअर करू शकते आहे. त्यासाठी शाहरूख परफेक्ट आहे असेही तिचे म्हणणे आहे.
   या उलट शाहरूख सांगतो की कतरिना इतकी उत्साही आणि आनंदी आहे की तिची सेटवरील एनर्जी खरोखर आऊटस्टँडिग आहे. तिच्यामुळे शाहरूखचा उत्साहही वाढतो. त्याच्या मते दरवर्षी तो थोडेफार चित्रपट करतो तेव्हा तरूण कलाकारांबरोबर काम करताना त्याला खूप शिकायला मिळते. कतरिनाही तिच्या वाट्याला आलेल्या सीनकडे विविध प्रकारांनी पाहते व तिचा सहकलाकार म्हणून मलाही ते आत्मसात करावे लागते. हे गिव्ह अॅन्ड टेक म्हणजे आपले देणेघेणे हो, खूपच फॅन्टास्टिक असल्याचे शाहरूख सांगतो.
  कतरिना आणि शाहरूखच्या या देण्याघेण्याकडे आपला सल्लू कांही ऑब्जेक्शन घेतोय, का तोही मोकळ्या मनाने या बंधांकडे पाहतोय हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

Leave a Comment