मास्टर ब्लास्टर सचिनचे ४० व्या वर्षात पर्दापण

नवी दिल्ली, दि. २४ – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आज म्हणजे २४ एप्रिलला  ४० व्या वर्षात पदार्पण केले. सचिन आपला वाढदिवस चंदीगडमध्ये पत्नी अंजली आणि मुंबई इंडियन्सच्या खेळांडूसोबत साजरा करणार आहे.
    बुधवारी मुंबई इंडियन्सचा पंजाबविरूद्ध सामना असल्यामुळे सचिन संघासोबत मोहालीत दाखल झाला आहे.  मोहालीत मुंबई इंडियन्सच्या संघासोबत सचिन ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला आहे तेथेच वाढदिवसानिमित्त मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.
    दरम्यान, सचिनच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हॉटेलच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. त्यातील एकाने सचिनच्या महाशतकानंतर हा त्याचा पहिलाच वाढदिवस असल्याने आपण सर्व त्याच्या वाढदिवशी १० किलोचा केक कापणार असल्याचे सांगितले.

1 thought on “मास्टर ब्लास्टर सचिनचे ४० व्या वर्षात पर्दापण”

Leave a Comment