आजपासून फर्स्ट डिव्हिजन फुटबॉल, सुपर सिक्स फेरी

नागपूर, दि. १९ – जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फेआयोजित फर्स्ट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीला २० एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. याआधी काही तांत्रिक कारणामुळे सुपर सिक्स फेरी स्थगित करण्यात आली होती.
    सुपर सिक्स फेरीत अंजुमन स्पोटर्स क्लब, मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट, ईगल स्पोर्टिंग क्लब, ऑरेंज सिटी क्लब, यामाहा फुटबॉल क्लब व यंग अंसार क्लबने स्थान निश्‍चित केले आहे. सुपर सिक्स फेरीतील सर्व सामने हिस्लॉप महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. अव्वल क्रमांकावर राहणारा संघ विजेता ठरणार असून, द्वितीय क्रमांकावरील संघाला उपविजेतेपद मिळणार आहे. २० एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता मध्ये रेल्वे इन्स्टिट्यूट व यंग अंसार क्लब दरम्यान सुपर सिक्स फेरीतील पहिली लढत होईल, असे स्पर्धेचे समन्वयक मोहम्मद जावेद राणा यांनी कळविले.

Leave a Comment