गोवा पोलिस खात्यात महत्वाचे फेरबदल

पणजी, दि. १७ – पर्रीकर सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्यात पहिल्यांदाच पोलिस खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले असून १२ उपअधीक्षक, ३४ निरीक्षिक व अनेक पोलिस कर्मचार्‍यांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सरकारने ५ उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्याही केल्या आहेत.
    राज्यात पर्रीकर सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासनात लहानमोठे फेरबदल करण्याचे सत्र सुरूच आहे. परंतु पोलिस खात्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्याप्राणात खांदेपालट झाली आहे. बदली झालेल्या उपअधीक्षकांमध्ये गजानन प्रभुदेसाई, सॅमी तावारीस, उमेश गावकर, महेश गावकर, मोहन नाईक, मिळू राऊत देसाई, बॉसुएट सिल्वा, जयप्रकाश नागवेकर, चंद्रकांत साळगावकर, गुरूप्रसाद म्हापणे आदी उपअधीक्षकांचा समावेश आहे. उमेश गावकर यांना पणजीचे उपविभागीय अधिकारी ही महत्वाची जबाबदारी देण्यात आली असून महेश गावकर यांना केपेचे उपअधीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे.
    पोलिस निरीक्षकांमध्ये, रमेश गावकर, संतोष देसाई, नीलेश राणे, सिद्धांत शिरोडकर, राजेंद्र राऊतदेसाई, भानुदास देसाई, राहुल परब, तुषार वेर्णेकर, चंदन पाटील, सुदेश नाईक, निनाद देऊळकर, सुरेश नाईक गावकर, सूरज हळर्णकर, मनोज म्हार्देळकर, नोलास्को रापोज आदींचा समावेश आहे. जन्मतारखेवरून वादात सापडलेले उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली असून सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकृत केला आहे.