
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिटा सध्या गायब झालेली आहे. ती सध्या काय करत आहे, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर आहे की, बाईसाहेबांनी आता पुन्हा चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे.प्रिती सध्या पॅरिसमध्ये असून तिथे ती ‘इश्क इन पॅरिस’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. ‘इश्क इन पॅरिस’ हा भारत आणि फ्रांसचा संयुत्त प्रोजेक्ट आहे. यात प्रिती आर्धी भारतीय आणि आर्ध्या फ्रांसिस मुलीच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रेम सोनी करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रसिध्द अभिनेत्री इसाबेल निवेदिकेच्या भूमिकेत आहे, त्या पॅरिस मधील सर्व पात्रांचा प्रेक्षकांना परिचय करुन देतात. दिग्दर्शक प्रेम सोनीही या प्रोजेक्टबद्दल उत्साही आहे.
