`कुलपिक्स’ ची नवी श्रेणी

मुंबई, दि. १२ – कॅमेर्‍यांची निर्मिती करणार्‍या निकॉनने `कुलपिक्स’ ची नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. नवीन श्रेणीतील १३ कॅमेरे `निकॉन आर’ या जागतिक तंत्रज्ञानावर आधारित असून यामध्ये हिंदी मेन्यू आणि हाय डेफिनेशन दर्जाची पिक्चर क्वालिटी मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. यामध्ये `एल’ श्रेणीतील कॅमेर्‍यांची किंमत ४,९९० ते १५,४५० च्या दरम्यान आहे. तर `एस’ श्रेणीतील कॅमेरे ५,९५० पासून आहेत, तर `पी’ श्रेणीतील कॅमेर्‍यांची किंमत १६,९५० व २३,९५० रूपये असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
    ग्राहकांना अधिक चांगल्या दर्जाचे कॅमेरे देण्यासाठी कंपनी नेहमीच प्रयत्न करीत असून त्याचाच एक भाग म्हणून कंपनी कुलपिक्सची नवी श्रेणी आणली असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिरोशी तकाशिना यांनी सांगितले. कुलपिक्सची नवीन श्रेणी लहान कॅमेर्‍यांच्या बाजारपेठेत यशस्वी ठरेल, असा विश्‍वासही तकाशिना यांनी व्यक्त केला.

Leave a Comment