क्रीडा मानसशास्त्रवर राष्ट्रीय चर्चासत्र १९ ला

नागपूर, दि. ११ –  प्राचार्य अरुणराव कलोडे महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे १९ एप्रिल रोजी अमरावती रोडवरील वनामती भवन येथे शारीरिक शिक्षणात तणाव व्यवस्थापन व क्रीडा मानसशास्त्र विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.
चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. सुधीर दुधाळे, साईबाबा लोकसेवा संस्थेच्या अध्यक्षा वीणा कलोडे, ऍड. आशिष कलोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यूजीसीद्वारे पुरस्कृत या चर्चासत्रात डॉ. राजा आकाश, डॉ. शैलेष पानगावकर व डॉ. अमर दामले हे विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. अधिक माहितीसाठी ९४२१७२१२२५ क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Comment