ब्राह्नणांचे हक्क व अधिकारासाठी दिल्लीत दोन दिवसांचे शक्तीप्रदर्शन

मुंबई, दि. ३ – देशाला स्वातंत्र्य मिळवून ६५ वर्षे उलटली तरीही सर्वभाषिक ब्राह्नणांना त्यांचे हक्क व अधिकारांपासून अद्यापही वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी देशातील सर्वभाषिक ब्राह्नण २८ व २९ एप्रिल रोजी एकजुटीने दिल्लीतील रामलीला मैदानावर आपले शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
यासंदर्भातील माहिती अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्नण महासंघाचे अध्यक्ष वेदाचार्य मोरेश्वर घैसास यांनी आज प्रेसक्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
लोकशाही विचारांना नव्हे तर संस्थेला महत्व असते. देशाच्या राजकारणातही ब्राह्नण समाजाला स्थान नाही. ब्राह्नणांच्या मुलांना ९० टक्के गुण मिळूनही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशापासून वंचित राहावे लागते. ही सर्व गंभीर स्थिती पाहता देशातील सर्वभाषिक ब्राह्नण एकत्र येऊन दिल्लीत आपल्या हक्क व अधिकारांसाठी शक्तीप्रदर्शन करणार आहेत, असे घैसास म्हणाले.
दिल्लीत रामलीला मैदान येथे ब्राह्नणांचे महाकुंभाचे आयोजन केले असून या महाकुंभात १० लाख सर्वभाषिक ब्राह्नण सहभागी होतील असे त्यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रणव मुखर्जी, भाजपा नेते डॉ. मुरली मनोहर जोशी, भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आदी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या नेत्यांना जर मुस्लिमांच्या इफ्तार पार्टीला जाण्यात आनंद वाटतो तर ब्राह्नणांच्या महाकुंभास त्यांनी हजर राहायला काहीच हरकत नसावी, असे घैसास म्हणाले.
यावेळी ब्राह्नण समाजातर्फे काही ठराव मंजूर केले जातील. तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना ब्राह्नणांचे एक शिष्टमंडळ भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देणार आहे.

Leave a Comment