सोनिया गांधींकडे ४५ हजार कोटींची संपती असल्याचा अमेरिकन वेबसाईटचा दावा

नवी दिल्ली, दि. १३- जगातील सर्वात श्रीमंत राजकीय व्यक्तींमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा चौथा क्रमांक असून, त्यांच्याकडे सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा दावा एका अमेरिकन वेबसाईटने केला आहे. अमेरिकेतील बिझनस इनसायडर या संकेतस्थळाने जगातील श्रीमंत राजकीय व्यक्तीची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये त्यांनी सोनियांना चौथे स्थान दिले आहे. यापूर्वीही जर्मनीच्या डी वेल्ट वृत्तपत्रात अशाच प्रकारचे वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यात जगातील सर्वात श्रीमंत २३ नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. यादीमध्ये सोनिया गांधी चौथ्या स्थानी होत्या. जागतिक लक्झरी गाईडच्या आधारे आपण ही यादी प्रसिध्द केल्याचे या वेबसाईटने सांगितले आहे.

Leave a Comment