मायावतींचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली, दि. १३ – बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी मंगळवारी राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मायावती लखनौ मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राज्यसभेतील निवडणुकींबाबत मायावतींनी मंगळवारी सकाळी आपल्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यात आमदार, खासदार आणि पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित होते. या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवची कारणे शोधण्याचा प्रयत्न सदर बैठकीत करण्यात आला. तसेच मायावतींनी आपल्या नेत्यांना राज्यात विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या प्रकारे बजाविणे व पुढील लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यासंबंधित निर्देश दिल्याचे बैठकीस उपस्थित असलेल्या एका नेत्याने सांगितले

Leave a Comment