लोकसभा सदनात शरद पवारांना आली भोवळ

नवी दिल्ली, दि. १३ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भोवळ आली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या खासदारांनी त्यांच्याकडे धाव घेतली. पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पवार यांना त्यांच्या गाडीतून रुग्णालयात नेले. अशक्तपणामुळे पवारांना चक्कर आल्याचे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी सांगितले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पवारांनी लोकसभेत कृषी क्षेत्रासंबंधित काही प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र अचानक ते घेरी येऊन पडल्याचे सूत्रांनी सांगितले

Leave a Comment