ईशा देओल लवकरच विवाह बंधनात

हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची लाडकी कन्या ईशा देओल बिझनेसमन भारत तख्तानी बरोबर लवकरच विवह बंधनात अडकणार आहे. नुकताच  ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या मुहर्तवर या दोघांचा साखरपुडाही पार पडला. आता हेमामालिनी आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. लवकरच ईशा-भारतच्या लग्नाची तारीख हेमामालिनी जाहिर करणार आहे. लग्नसोहळा शाही व्हावा यासाठी हेमामालिनी चांगल्या पंचतारांकित हॉटेलच्या शोधात आहे. शिवाय साखरपुड्याला आमंत्रित करण्यात न आलेल्या पाहुण्यांना लग्नसोहळ्यात मात्र आठवणीने आमंत्रित करण्यात येणार आहे. सिधी आणि तामीळ पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

Leave a Comment