राष्ट्रवादीची महत्वाकांक्षा आणि मनसेचा इंजिन वेग हेच या निवडणुकीचे फलित

कोणत्याही परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्याचा राजकीय ताबा घेण्याच्या मानसिकतेत सध्या राष्ट्रवादीकाँग्रेस पक्ष आहे याचाच परिणाम पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे परिणाम जाहीर होताच राष्ट्रवादीने ‘आम्ही कॉग्रेसशी जूळवून घ्यायला बांधील नाही’ असे जाहीर करून टाकले आहे. महापालिकेच्या निवडणुकीतूनही राज्य व्यापी परिणामाची हीच बाब पुढे आली आहे आणि दुसरी बाब म्हणजे राज्यात मनसेला येवढ्या जागा मिळतील असा अंदाज कोणीही केला नव्हता. पुण्यात त्यांना भाजपा, काँग्रेस आणि सेना यांच्या प्रत्येकी जागेपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. राज ठाकरे यांनी या वेळी पुण्याच्या मुठा नदीत एक निवडणुक प्रचार सभा घेतली ती लकडी पूल ते बालगंधर्व पूल या टप्प्यातील निम्मी जागा भरली होती. या प्रचंड सभेचे वर्णन करण्याचे कारण येवढेच की, महाराष्ट्रातील जाणता राजाच्या सभेला यावेळी एकेका शाळेच्या हुतुतू ग्राउंडवर सभा घेण्याची वेळ आली. त्यातील अजून धक्कादायक बाब म्हणजे शरदराव पवार यांनी जेथे जेथे सभा घेतल्या तेथे तेथे त्यांच्या पक्षाचे मातब्बर उमेदवार पडले. जेथे जेथे शरद पवार यांनी सभा घेतल्या त्या सर्व ठिकाणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतल्या. आणि सभा घेतल्या येवढेच लक्षणीय नव्हे तर तेथे ‘या माणसाच्या स्वार्थीवृत्तीमुळे राज्याचे वाटोळे झाले असे आरोपही केले पण मुख्यमंत्र्यांच्या सभेचाही त्या भागातील फारसे उमेदवार निवडणून येण्यात रूपांतर होअू शकले नाही.
    या वेळी निवडणुकीच्या परिणामाने ही निवडणुक गाजली नाही पण एकमेकावरील आरोपंानी मात्र निश्चत गाजली. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला ‘यांचे नामोनिशाण राहणार नाही’ अशा स्वरुपाच्या आरोपाची लाखोली वाहिली पण ते आरोप सेनेनेही गंभिर्यांने घेतले नाहीत आणि मतदारांनीही गांभिर्याने घेतल नाहीत. त्यांनी  भाजपाला प्रतिगामी व जातीयवादी म्हणले पण त्याचा परिणाम त्यांचे बळ कमी होण्याऐवजी वाढले पण मुख्यमंत्र्यांनीही आणि त्यांच्या पक्षातील मंत्र्यांनीही राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री यांच्यावर जे आरोप केले ते केवळ गंभीर नव्हते पण इंडियन पिनल कोडमधील गंभिरातील गंभीर कलमे लावली जातील अशा स्वरुपाचे आरोप केल. निवडणुकांतील पद्धतीप्रमाणे त्याला वस्त्रहरण भाग एक, भाग दोन आणि आता तर ऐका आणि पहा भाग तीन आणि भाग चार, अशा जाहिरातीही केल्या गेल्या. निवडणुकीच्या धुलीवंदनानंतर जे खाली उरले आहे तेही गंभीर आहे कारण श्री नारायण राणे यांनी अजित दादा यांच्यावर ‘त्यांनी प्रत्येक खात्यात टक्केवारी केली आहे. भ्रष्टाचार केला नाही अशी एक जागा नाही. पुण्याचा मेट्रोप्रकल्प भूमिगत करून तीनपट महाग करण्याचे ठरविले ते केवळ त्याच्या मधाळ सायीवर तीनपट हात मारता यावा म्हणून’ अशा स्वरुपाची आरोप मालिका भाषणात वीस मिनिटे सुरु होती.
    अशा काही बाबी सोडल्या तर या महापालिका निवडणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे  त्या त्या पक्षांना मिळालेले बळात फारसा फरक झालेला नाही. मनसे नावाचा एक घटक साडेतीन पट अधिक जागा मिळवून सारी पाटावर आला आहे हे खरे पण त्यांने शिवसेना, भाजपा किवा कॉग्रेस यांच्या जागा हिसकावून वगैरे घेतलेल्या नाहीत. कारण भाजपाच्या पूर्वी पंचवीस होत्या त्या आता सव्वीस झाल्या आहेत आणि सेनेच्या वीस होत्या त्या पंधरा झाल्या आहेत. रिपाईची एक जागा मिळाली आहे त्यामुळे त्यांच्या ताळेबंदात फारसा फरक झालेला नाही. काँग्रेसच्या पस्तीस होत्या त्या अठ्ठावीस झाल्या आहेत. ह्ी पीछेहाट आहे पण राष्ट*वादीच्या एक्केचाळीस होत्या त्या पन्नास झाल्या आहेत. एका काँग्रेसच्या दुसर्‍या काँग्रेसला मिळाल्या ही वस्तुस्थिती आहे . काँग्रेसचे प्रमुख खासदार सुरेश कलमाडी यांना दीड हजार कोटीच्या भ्रष्टाचाराखाली पक्षातून निलंबित करून त्यांच्यावर सीबीआयची चौकशी बसविली आणि नउ महिने त्यांना तिहारजेलची हवा दिली. त्याचाच तो परिणाम होता. अर्थात येवढ्यानेही भागले नाही. कारण दरम्यानच्या काळात पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे आर आर पाटील  यापैकी कोणीही गंभीर आरोपातून सुटले नाहीत. आरोपाची राळ आणि गाळ येवढ्या मोठ्या प्रमाणावर उडाला की, एकवेळ मिळालेल्या जागातून मार्ग काढता येईल पण काँग्रेसने राष्ट्रवादी नेत्यांची आणि राष्ट*वाद्यांनी काँग्रेसवाल्यांची येवढी लफडी कुलंगडी बाहेर काढली आहेत की, एकमेकाशी बरत साधे सरळ बोलायचे वातावरण तयार व्हायलाही बराच वेळ लागणार आहे. बर्‍याच वेळा हे वाद प्रचारापुरतेही असण्याची शक्यता असते पण बर्‍याच वेळा ते जिव्हारी असण्याचीही शक्यता असते. या वेळी आरोपाचे स्वरुप येवढे गंभीर आहे की, परस्पर संबंधांना आतून तडा गेला असल्याची शक्यताही बरीच आहे.
    या सार्‍या बाबी बघता ‘एकच प्याला’ या नाटकामधील तळीराम याने सामाजिक विकासाचे मार्ग दाखविले आहेत. त्याचाच कोठे तरी वापर होणार असे वाटू लागले आहे. तळीराम हे जरी दारुडे पात्र असले तर त्याचे निर्माते हे राम गणेश गडकरी आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने ‘खरे बोलावे ’ असे जर वाटत असेल तर तळीरामाचा एकच कलमी उपाय असा की, ‘दारू प्यायल्यावर माणूस खोटे बोलूच शकत नाही’ हा प्रकार तर यावेळी स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षात प्रथमच घडत आहे अशा पद्धतीने झाला. अर्थात दारुपेक्षाही निवडणुक प्रचाराचा कैफ काही औरच असतो. आणि तो जागृत झाल्यामुळे शरदराव पवार, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार ,नारायण राणे यांनी एकमेकावर आरोप सुमनांची उधळण केली. शरदराव पवार हे साधारणपणे जाहीर आरोप न करणारापैकी आहेत. तरीही त्यांनी ज्या निवडूनही येता येत नाही, याची दखल ती काय घ्यायची असे म्हणून दाखविले.
    विधीमंडळाचे किवा संसदेचे अधिवेशन संपल्यावर पत्रकारांच्या हातात जे अजेंड्याचे कागदपत्रे असतात त्यावर एक वर्षे शांतपणे विशेष बातम्याची पत्रकारिता करता येते त्याच प्रमाणे या निवडणुकीत दोन्ही कॉग्रेसपक्षांच्या नेत्यांनी एकमेकावर जे आरोप केले आहेत, त्यांचे स्वरुप असे आहे की, एखाद्या तरुण पत्रकाराला ते पुढील तीस चाळीस वर्षे एक्स्ल्क्युझिव्ह बातमीदारी करता येईल. अर्थात या प्रकाराला काही पत्रकारांनी आरंभही केला. अजित पवार यानी ‘कोणत्याही परिस्थितीत पुण्याला मेट*ो ट*ेन देणार आणि ती पाच वर्षात पूर्ण करून दाखविणार, अशा बातमीवर टिपणी करताना ‘असेच जर आहे तर मग गेल्या वीस वर्षात कृष्णाखोरे बांधकाम का नाही झाले असा प्रतिप्रश्न केला.
    या निवडणुकीचे वैशिष्ठ्य असे की, निवडणूक जरी माघ महिन्न्यात पडत होती तरी सारी वार्तापत्रे फाल्गुनात पडत आहेत. त्यामुळे वातावरणाचा शिमग्यावर व धुलीवंदानवर परिणाम होणे सहाजिकच आहे. या सार्‍या धुरळ्यानंतर दोन बाबी मात्र शिल्लक राहात आहेत त्या म्हणजे कोणत्याही परिस्थितीत पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट*वादीचाच असला पाहिजे आणि तोही अजितदादाच असला पाहिजे ही जाणत्या राज्याची घोषणा आणि मनसेने आपले स्वरुप दाखविण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरात राज ठाकरे यांनी केवळ भाषणे करून प्रभाव मिळवला आहे, अजून त्यांच्या नरेंद्र मोदीच्या संबंधाचा परिणाम त्यांनी अजून दाखवायला आरंभ केलेला नाही. ते झाले तर  शहरे भाषणाने जिकली तर खेडी आता मोदी मैत्रीने जिकली असे झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
– मोरेश्वर जोशी, पुणे

Leave a Comment