सलमान आमीरची घट्ट मैत्री

अभिनेता सलमान खान आणि आमिर खान यांची मैत्री जगजाहिर आहे. हे दोघेही एकमेकांची स्तुती करतांना थकत नाहीत. आता हेच बघा ना, ‘बॉडिगार्ड’चा दिग्दर्शक सिद्दीकी नव्या सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. या सिनेमातही सल्लुमियाँच मुख्य भूमिकेत असावा अशी सिद्दीकी यांची इच्छा आहे.
मात्र सध्या सलमानच्या हातात ‘एक था टायगर’ आणि ‘दबंग-२’ हे दोन महत्वाचे प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे सलमान नवीन सिनेमा स्विकारत नाही.  मात्र सलमानची लोकप्रियता लक्षात घेऊन आपल्या नव्या सिनेमात सलमाननेच भूमिका करावी यासाठी सिद्दीकी अडून बसले आहेत.
सिद्दीकी यांची समजूत काढतांना सल्लुमियाँने त्यांना एक उपाय सुचवला आहे. त्याने त्याचा जिगरी मित्र म्हणजेच आमिरचे नाव त्यांना सुचवले आहे. इतकेच नाही तर आपण स्वतः आमिरशी याविषयी बोलणार असल्याचे सिद्दीकींना सांगितले आहे. या भूमिकेला आमिरच योग्य न्याय देऊ शकेल आणि ती वठवू शकेल असा विश्वास सलमानने व्यत्त* केला आहे. असा आहे सलमानचा याराना.

Leave a Comment