भगवान परशुरामाच्या पादुकांची पुण्यात दिडी

पुणे दि.१९- जागतिक व्यवसाय परिषदेच्या निमित्ताने येथील महाराष्ट्र चित्तपावन संघाने भगवान परशुरामाच्या पादुकांची दिडी रविवारी काढली होती. पुण्यातील कसबा गणपतीच्या देवळापासून सुरू झालेली ही दिडी टिळक रोडवरील चित्तपावन संघाच्या कार्यालयात विसर्जित करण्यात आली. सकाळी आठ वाजता कसबा मंदिरात पूजा करून ही दिडी निघाली.  मुकुंद अभ्यंकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या दिडीत आमदार गिरीष बापट यांच्यासह सिनेक्षेत्रातील श्रीरंग गोडबोले, मधुरा वेलणकर, क्रीडा पत्रकार सुनंदन लेले असे अनेक मान्यवर उपस्थित होते. पुण्यात अशी दिडी प्रथमच काढण्यात आल्याचे चित्तपावन संघाचे खजिनदार केतन जोगळेकर यांनी सांगितले. ते म्हणाले की तरूणांमध्ये व्यवसाय आणि नोकर्‍यांबाबत जागृती व्हावी व रोजगारात वाढ व्हावी या उद्देशाने या दिडीचे आयोजन करण्यात आले होते.