विश्व मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी महानोर

पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) – कॅनडामधील टोरांटो येथे पुढील वर्षी ३ ते ५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित चौथ्या विश्व मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक ना. धों. महानोर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीयमराठी साहित्यमहामंडळाच्या सर्वसाधारण सभेत महानोर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती साहित्यमहामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी दिली.
विश्व मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत नाही. मराठी साहित्यमहामंडळाच्या सभेत साहित्यिकांची नावे सुचवली जातात आणि सर्वानुमते निर्णयघेतला जातो. ज्यांच्या नावावर सहमती होते, त्यांची संमती घेतली जाते; त्यानंतरच अध्यक्षांचे नाव जाहीर केले जाते. कॅनडात टोरांटो येथे ३ ते ५ ऑगस्ट २०१२ या कालावधीत होणार्‍या चौथ्या विश्व मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास महानोर यांनी संमती दिल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी सिगापूर येथे झालेल्या तिसर्‍या विश्व मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद  नाटककार महेश एलकुंचवार यांनी भूषविले होते. अखिल भारतीयमराठी साहित्यमहामंडळाच्या सर्वसाधारण सभेत महानोर यांची निवड करण्यात आली. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, महानोर, अखिल भारतीयमराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे, कॅनडा येथील प्रतिनिधी रिना देवधरे आणि नमिता दांडेकर तसेच बृहन्महाराष्ट*ातील साहित्यमहामंडळाचे तीन प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते, असे तांबे यांनी सांगितले.
महाराष्ट* सरकारचा जीवनगौरव आणि जनस्थान पुरस्काराने सन्मानित झालेले महानोर यांनी शेतीविषयक लिखाण केले आहे. अभ्यासू, निसर्गप्रेमी कवी म्हणून महानोर यांची ओळख आहे. मूळचे खानदेशातील असलेल्या महानोर यांच्या कविता मराठी मनाला थेट साद घालणार्‍या आहेत.

Leave a Comment