ब्लॅकबेरीचे तीन नवे हँडसेट

मुंबई, दि.२५ नोव्हेंबर- स्मार्टफोनच्या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी रिसर्च इन मोशनने (रिम) ब्लॅकबेरी ७ ऑपरेटिग सिस्टमचा समावेश असलेले ब्लॅकबेरी बोल्ड ९७९०, ब्लॅकबेरी कर्व्ह ९३५०, ब्लॅकबेरी कर्व्ह ९३८० हे तीन नवीन मोबाईल लाँच केले आहेत. अधिक वेगवान इंटरनेट व अत्याधुनिक मल्टिमिडियाचा या तिन्ही मोबाईलमध्ये समावेश करण्यात आला आहे. ब्लॅकबेरी ७ ऑपरेटिग सिस्टिमला भारतीय ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे कंपनीचे संचालक कृष्णदीप बरूआ यांनी म्हटले आहे. या तीन मोबाईलमुळे रिमच्या भारतातील मॉडेलची संख्या ७ वर गेली आहे.

Leave a Comment