आयफोन फोर एस विक्रीस

मुंबई, दि.२५ नोव्हेंबर- दूरसंफ क्षेत्रातील एअरटेल व एअरसेल या आघाडीच्या कंपन्यांकडून बहुचर्चित आयफोन फोर एस विक्रीस ठेवण्यात आला आहे.तब्बल ४४ हजार ५०० रुपये देवून अॅपलचा आयफोन फोर एस भारतीयांना घेता येईल. दोन कंपन्यांनी १ जीबी फोनची किमत ४४ हजार ५०० रुपये ठेवली आहे. ३२ जीबी व ६४ जीबीसाठी अनुक्रमे ५० हजार ९०० रु. व ५७ हजार ५०० रुपये किमत ठेवण्यात आली आहे. एअरटेल व एअरसेलच्या ठराविक ‘स्टोअर’ मध्ये आयफोन फोर एस विक्रीस उपलब्ध आहे.

Leave a Comment