
हैदराबाद ,दि.४ ऑक्टोबर- पाच एकदिवसीय आणि एकमेव टी- ट्वेंटी सामन्यासाठी अॅलेस्टर कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ मंगळवारी पहाटे भारतात दाखल झाला आहे. इंलंडच्या दौर्यांत चारीमुंड्या चित झालेला भारतीय संघ या मालिकेत पराभवाचे उट्टे फेडण्यास उत्सुक असणार आहे .
