गुगल पुन्हा अव्वल स्थानावर

मुंबई- व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील तरूणांना नोकरी देण्याबाबत इंटरनेट सर्च इंजिन गुगलने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गुगलला हा गौरव मिळाला. ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, जपान आणि अमेरिका येथील १.६० लाख लोकांनी गुगलमध्ये नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Leave a Comment