अण्णांच्या लढ्याला कलाकारांचा पाठिबा

पुणे, दि.२२- ओठांवर ‘हे राष्ट्र देवतांचे‘ ते  ‘जयोस्तुते श्री महंमाड्.ल्ये‘ यांसारखी देश भक्तीपर गाणी, डोक्यावर पांढरी गांधी टोपी आणि अण्णांच्या नावाचा जय घोष अशा अनोख्या पद्धतीने पुण्यातील कलाकारांनी रॅली काढून अण्णा हजारेंच्या लढ्याला पाठिबा दर्शवला.
या रॅलीमध्ये गायक अरूण दाते, सलील कुलकर्णी, संदीप खरे, प्रमोद रानडे, ऋषीकेश रानडे, जितेंद्र अभ्यंकर, विजय कोपरकर, गायिका सुवर्णा माटेगावकर, विभावरी आपटे, शास्त्रीय नृत्यांगना मनीषा साठे, शर्वरी जेमनीस, शमा भाटे, संगितकार नरेंद्र भिडे आदी सहभागी झाले होते. सकाळी साडे आठ वाजता कोथरूड येथील शैलेश सभागृहा पासून कर्नाटक हायस्कूल, कर्वे रोड मार्गे शैलेश सभागृह पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाणी गावून घोषणा देवून अण्णांना पाठिबा दर्शवण्यात आला.

Leave a Comment