पुणे येथे युवतीचा चाकूने वार करून खून

पुणे दि.८- कॉल सेंटरमध्ये कामास असणार्‍या तेवीस वयाच्या युवतीचा आज म्हणजे सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास चाकूने वार करून खून केल्याची घटना पुण्यात दत्तनगर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नीलम यादगिरी ही मूळची सोलापूरची तरूणी दिघी येथील कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती. ती तिचा मित्र सुमेध जाधव याच्या कुटुंबियांसमवेत पुण्यात राहात होती. सोमवारी सकाळीच ती सोलापूरहून आली व दिघीला कंपनीत कामावर हजर होण्यासाठी गेली तेव्हा एका युवकाने तिच्यावर चाकूहल्ला केला. त्यात जी जागीच ठार झाली. पोलिसांनी विजय दुधाळ या तरूणास संशयावरून ताब्यात घेतले असून एकतर्फी  प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे

Leave a Comment