भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी आंदोलने उभी राहण्याची शक्यता – भय्याजी जोशी

पुणे- भ्रष्टाचाराच्या विरोधात देशात आगामी काळात मोठी आंदोलने उभी राहण्याची शक्यता आहे याबाबत आता जबाबदार नागरिकांनी केवळ मूक दर्शक तर होता कामा नये आणि केवळ मूकसंमती देणारेही होता कामा नये तर त्यात सर्वशक्तीनिशी सहभाग घेण्याची आवश्यकता आहे, असे रा.स्व.संघाचे सरकार्यवाह श्री भय्याजी जोशी यांनी येथे प्रबोधन मंचाच्या वतीने आयोजित ‘भ्रष्टाचार विरोधी आंदोलने आणि नंतरची दिशा’या विषयावरील एक दिवसाच्या परिषदेचा समारोप करताना सांगितले. अध्यस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. आजच्या एक दिवसीय परिषदेत २२ संस्था सहभागी झाल्या होत्या.
श्री जोशी म्हणाले,भ्रष्टाचार दूर करण्याची संधी गेल्या काही दिवसात जगातील अनेक देशांना आली होती. स्विस बँका किंवा काळा पैसा ठेवणार्‍या जगातील मोठ्या बँकांनी त्या देशातील ससदांची मान्यता असेल तर तो काळा पैसा ठेवणार्‍यांचे नाव सांगू व तो पैसाही त्या सरकारला देवू अशी भूमिका घेतली आश्चर्याची आणि दुर्दैवाची बाब म्हणजे भारत सोडून सर्व देशांनी या संधीचा फायदा घेतला पण भारताने त्या दिशेने प्रयत्नही केला नाही. याचा अर्थ सरळ आहे की, येथील राज्यकर्त्यांच्या मनात तसे नव्हते कारण त्यांचे हात बरबटले असण्याचीच शक्यता अधिक होती. अजूनही सरकार त्या दृष्टीने पावले टाकण्यास तयार नाही.
गेले  काही दिवस तर भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत नाही, असा एक दिवसही जाताना दिसेनासा झाला आहे. त्यात सरकारमधील अुच्च पदस्थांचा सहभाग हा चितेचा विषय आहे.देशाची अर्थव्यवस्थाच भ्रष्टाचाराने बरबटली आहे असे वाटू लागले आहे., असें सांगताना ते म्हणाले, गेल्या काही दिवसात या विरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे आणि स्वामी रामदेव यांनी त्यादृष्टीने केलेली तयारी व देशातील नागरिकांनी त्यंाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी दाखवलेली मानसिकता याचे स्वागत होणे आवश्यक आहे.
भ्रष्टाचार निपटणे हा केवळ आंदोलनाचा विषय असता कामा नये असे संागताना ते म्हणाले, चारित्र्य निर्माण ही त्यातील आवश्यक बाब आहे आणि त्याबाबत आजही शिक्षणसंस्था आणि कुटुंबसंस्था यानी अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे.
सध्याच्या आंदोलनात प्रसारमाध्यमांनी जी भूमिका घेतली आहे, त्याबाबत त्यांचे आभिनंदन करणे आवश्यक आहे, अंसेही त्यांन सांगितले
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपल्या भाषणात म्हणाले, शिवकालात भ्रष्टाचार नव्हता एवढेच नव्हे तर शिवाजी महाराज जेंव्हाआगर्‍याला अटकेत होते तेंव्हा तर प्रत्येक जण अधिक कटाक्षाने व दक्षतेने काम करत होता. या अुदाहरणासाठी आपण शिवाजी महाराज यांचा आदर्श मानतो तो आज आंदोलन काळातही उपयोगी आहे.

Leave a Comment