पुणे – चार वर्षीय बालिकेचा निर्घृणपणे खून

पुणे: मावळातील बेबेद ओहोळ येथून तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या चार वर्षीय बालिकेचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. संशयित आरोपी फरार आहे.बेबेद ओहोळ येथे चाळीत राहणारी संजना रवींद्र यादव ही बालिका दि. २६ पासून बेपत्ता होती. त्याबद्दल तिचे वडील रावेंद्र यादव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी यादव राहत असलेल्या चाळीतील एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. ही खोली तीन दिवसापासून कुलूप बंद असल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी खोलीचे कुलूप तोडून शोध घेतला असता त्या खोलीत एका नायलॉनच्या गोणीत संजनाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. हि खोली अंजना शिंदे याची असून तो तीन दिवसापासून घरी आलेला नाही. त्यावरून संजनाचा खून त्यानेच केला असावा असा पोलिसांचा संशय आहे. संजनाचा मृतदेह सडलेला असल्याने तिचा खून कसा केला गेला याचा संदाज येत नसून शवविच्छेदनानंतरच ते कळू शकेल असे पोलिसांनी सांगितले.
      तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment