पुणे,दि.१०- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला येथून निवडून आलेले आमदार रमेश वांजळे यांचे आज रात्री साडेनउ वाजता हृदयविकाराने निधन झाले.त्यांचे वय अवघे ४५ होते. गळ्यात पावणेतीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने घालणारे म्हणून त्यांचा परिचय झाला होता.
मनसे आमदार वांजळे यांचे आकस्मिक निधन
आज रात्री साडे आठवाजता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले डॉक्टरांच्या तपासणीत त्यांची शुगरपातळी बरीच खाली गेली असल्याचे लक्षात आले. म्हणून त्यांना येथील जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे पण तेथेहीची त्याची प्रकृती प्रतिसाद नेईना म्हणून त्याना त्वरीत जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण त्यांना तेथे दाखल करण्यापूर्वीच रात्री पावणेदहा वाजता त्यांचे निधन झाले.
दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत ते निवडून आले पण विधानसभेत समाजवादीपक्षाचे आमदार आबु आझमी यांनी मराठीत शपथ घेतली नाही म्हणून त्यांच्या समोरील माईक काढून घेतला होता त्यामुळे आठ महिने पर्यंत वांजळे त्यांचे आमदारपद निलंबित झाले होते.
