रामदेव बाबांचे नेतृत्व परिपक्व नाही अण्णा हजारे

पुणे दि.११-  योगगुरू रामदेव बाबा सामाजिक आंदोलनाचे नेतृत्त्व करण्यासाठी पुरेसे मॅच्युअर नसल्याचे मत समाजसेवक व भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रमुख अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. रामदेव बाबांनी अकराहजार जणांचे सशस्त्र दल उभारण्याची जी घोषणा केली ते त्यांच्या अपरिपक्वतेचेच लक्षण असल्याचे अण्णा यावेळी म्हणाले. योग विषयात ते निपुण आहेत मात्र अन्य विषयात त्यांना अजून खूपच शिकायचे आहे असे सांगून अण्णा म्हणाले की कोणतेही सामाजिक कार्य करताना करणार्या ला अनेक प्रकारचे अनुभव असणे आवश्यक असते. रामदेवबाबांना असा अनुभव कमी आहे त्यामुळेच निर्णय घेताना ते फार घाईने घेतात. अशा कार्यात घाई कधीच उपयोगाची नसते.

    कोणतेही आंदोलन छेडताना त्यात सामील झालेल्यांचा विचार घेणे, त्यांची मते ऐकून घेणे, चर्चा करणे व नंतर निर्णय घेणे आवश्यक असते. आम्ही आंदोलन करताना ही प्रक्रिया पाळतो मात्र रामदेवबाबांचे तसे नाही. ते एकटेच सगळे निर्णय घेतात असे सांगून अण्णा म्हणाले की यामुळेच त्यांच्या कृतीचा सरकारलाच फायदा झाला आहे. अर्थात रामदेवबाबांचे आंदोलन असेा वा आमचे आंदोलन असो त्यात फरक असला तरी भ्रष्टाचार विरोधी लढा हे लक्ष्य एकच आहे असेही अण्णांनी सांगितले.

Leave a Comment